Skip to main content

Posts

Showing posts from 2018

बालभारतीचे बारावी साठी मानसशास्त्राचे पाठ्यपुस्तक ….मानसिक गुलामगिरीची परिसीमा.

बालभारतीचे बारावी साठी मानसशास्त्राचे पाठ्यपुस्तक ….मानसिक गुलामगिरीची परिसीमा. भारताला स्वातंत्र्य १९४७ साली मिळाले. ब्रिटीश आपल्या भूमीत चालते झाले . पण त्यांनी आपल्या शिक्षणात आणि त्या अनुषंगाने आपल्या विद्वानांमध्ये जी भारतीय संस्कृती बद्दल हीनत्वाच्या भावनांची बीजे पेरून ठेवली आहेत ती नष्ट होण्याची गोष्ट तर सोडाच पण आता त्याचा समृद्ध वृक्ष झाला आहे कि काय अशी शंका अनेक कारणामुळे येते. त्याचेच एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणजे बालभारतीचे हे बारावीसाठी तयार केलेले मानसशास्त्राचे पाठ्यपुस्तक . हे पुस्तक वाचल्यावर सकृतदर्शनी असे वाटते कि हे एखाद्या इंग्रजी पुस्तकाचे भाषांतर असावे.शिक्षण मंडळाने आणि त्यांच्या संपादक मंडळाने काही निश्चित विचार करून आणि प्रयत्न करून हे पाठ्यपुस्तक लिहिले असावे असे अजिबात वाटत नाही . गोऱ्यालोकांचे सर्व काही बरोबर आणि भारतीय संस्कृतीचे सर्व काही चुकीचे अशी भावना आपल्या मनात निर्माण करण्याचे महत कार्य जे मेकौले (Thomas Macaulay)पासून सुरु झाले आहे ते आज सुद्धा तेवढ्याच जोमाने आपलेच बंधुभगिनी करीत आहेत याचा संताप प्रत्येक सुबुद्ध नागरिकाला येणे अतिशय गरजेचे...

सलमानचे चेटूक आणि आपली अविवेकी मानसिकता.

सलमानचे चेटूक आणि आपली अविवेकी मानसिकता. फेब्रुवारी १९९८ मधील काळवीट मारल्याची घटना . ५ एप्रिल २०१८ मध्ये जोधपुर कोर्टाचा निकाल. सलमान एका खटल्यामध्ये दोषी ठरला. आता परत अपील .. हायकोर्ट  आणि नंतर सुप्रीम कोर्ट.अजून २० वर्षे सहज जाणार. २० वर्षे गेलेलीच आहेत ! असे हे सलमानखान या न्याय व्यवस्थेवर काय चेटूक करतो आहे  कुणास ठाऊक ? एखाद्या सामान्य माणसा विरुद्ध असा खटला इतकी वर्षे चालला असता ? “Justice delayed is justice denied” वगैरे फक्त पुस्तकात छापायला राखीव ठेवलेली वाक्ये आहेत का ? या खटल्याशी संबंधित लोकांना या सलमान मुळे मिळणारी प्रसिद्धी हवी हवीशी वाटते म्हणून इतकी वर्षे हा खटला चालू आहे का ? नक्की कसले चेटूक आहे हे ? खालचे कोर्ट नंतर हायकोर्ट  आणि नंतर सुप्रीम कोर्ट असे सगळे या नाटकात कश्यासाठी  सहभागी होतात किवा झालेत ? इतके सगळे दिग्गज या खेळात सहभागी झालेत पण साध्य काय झाले आहे ? शिकार केल्याबद्दल या सलमानखानला काही पश्चाताप वगैरे झालेला दिसत नाही ! शिकारींचे प्रमाणही काही या हिंदुस्तानांत कमी झालेले दिसत नाही ! कायदे कश्यासाठी करायचे ...

सावधान ! आपल्या समाजातील क्रौर्य वाढत आहे ...जागे व्हा आणि जागे रहा ..

सावधान ! आपल्या समाजातील क्रौर्य वाढत आहे ...जागे व्हा आणि जागे रहा ..  प्रसंग पहिला. एका तरूण मुलीच्या मागे चार ते पाच जण शाळेची बस घेऊन लागतात. ती मुलगी दुचाकी वरून कॉलेज मधून घरी येत असताना, तिचा पाठलाग करतात आणि बस आडवी घालून तिच्या दुचाकीचा अपघात घडवून आणतात. ती मुलगी जखमी होते . अगदी चित्रपटात घडते तसे दृश्य ...पण इथे खरे घडणारे ….त्या मुलीच्या जीवाचे काही बरे वाईट झाले नाही हे तिचे भाग्य. पण झाले असते तर ? प्रसंग दुसरा. एक दत्तक घेतलेली मुलगी . काळी सावळी. गोरी अजिबात नाही . तिच्या आईला ती गोरी व्हायला हवी आहे. कोण काय सल्ला देते तर कोण काय ? एक सल्ला. तिचे अंग काळ्या दगडाने घासा...आईच्या नावाला कलंक लावणारी बाई हे करून बघते ...त्या पोरीचे सगळे अंग सोलवटून निघते . वेदनेने तो ओरडू लागते .. कोणीतरी शहाणी शेजारीण पोलिसांना बोलावते आणि या मुलीची सुटका होते. प्रसंग तिसरा.  एक तरूण आपल्या आईला आणि सक्ख्या भावाला भोसकून मारून टाकतो . जवळजवळ ५० वेळा हा आपल्या आईला भोसकतो. त्याच्या मनाप्रमाणे त्याला मालमत्ता मिळाली  नाही म्हणून. प्रसंग चौथा. एका आजारी आणि अं...