सलमानचे चेटूक आणि आपली अविवेकी मानसिकता. फेब्रुवारी १९९८ मधील काळवीट मारल्याची घटना . ५ एप्रिल २०१८ मध्ये जोधपुर कोर्टाचा निकाल. सलमान एका खटल्यामध्ये दोषी ठरला. आता परत अपील .. हायकोर्ट आणि नंतर सुप्रीम कोर्ट.अजून २० वर्षे सहज जाणार. २० वर्षे गेलेलीच आहेत ! असे हे सलमानखान या न्याय व्यवस्थेवर काय चेटूक करतो आहे कुणास ठाऊक ? एखाद्या सामान्य माणसा विरुद्ध असा खटला इतकी वर्षे चालला असता ? “Justice delayed is justice denied” वगैरे फक्त पुस्तकात छापायला राखीव ठेवलेली वाक्ये आहेत का ? या खटल्याशी संबंधित लोकांना या सलमान मुळे मिळणारी प्रसिद्धी हवी हवीशी वाटते म्हणून इतकी वर्षे हा खटला चालू आहे का ? नक्की कसले चेटूक आहे हे ? खालचे कोर्ट नंतर हायकोर्ट आणि नंतर सुप्रीम कोर्ट असे सगळे या नाटकात कश्यासाठी सहभागी होतात किवा झालेत ? इतके सगळे दिग्गज या खेळात सहभागी झालेत पण साध्य काय झाले आहे ? शिकार केल्याबद्दल या सलमानखानला काही पश्चाताप वगैरे झालेला दिसत नाही ! शिकारींचे प्रमाणही काही या हिंदुस्तानांत कमी झालेले दिसत नाही ! कायदे कश्यासाठी करायचे ...
काही घटनांवर माझे भाष्य .